Lok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानात
Lok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानात
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यावेळी निवडणूक होणार आहे. लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी धुडकावून लावली. त्यामुळे इंडिया आघाडीनं अध्यक्षपदासाठी उमेदवार दिलाय. त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार के. सुरेश यांनी अर्ज भरलाय. भाजपकडून ओम बिर्ला यांनाच पुन्हा संधी देण्यात आलीय. स्वातंत्र्यानंतरची अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची ही तिसरी वेळ आहे. उद्या सकाळी ११ वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
हेडलाईन्स
महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकरांची जागा बीएमसीला देण्यास राज्य सरकारची मंजुरी, सेंट्रल पार्क, ओपन स्पेस, गार्डनसाठी वापरणार जागा
लोकसभा अध्यक्षपदाची रस्सीखेच, आज सकाळी ११ वाजता मतदान, भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यात चुरस
राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणार, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची घोषणा
मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान, मतदान केंद्रांवर रांगा, महायुती आणि मविआची रस्सीखेच
मुंबई शिक्षकमध्ये भाजपचे उमेदवार शिवनाथ दराडे, आणि पदवीधरमध्ये किरण शेलारांचं मतदान, वरळीत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही बजावला मतदानाचा हक्क
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस अल्पसंख्याक उमेदवार देण्याची शक्यता वजाहत मिर्झा, मुझफ्फर हुसेन, नसीम खान यांची नावे आघाडीवर