CDS Bipin Rawat यांच्या अपघाताविषयी सर्व काही; मा.संरक्षण राज्यमंत्री Subhash Bhamre EXCLUSIVE
Tamil Nadu Chopper Crash : बंगळुरु : कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter crashed) झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी (Niligiri Katteri) ही दुर्घटना घडली. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे.
हे हेलिकॉप्टर नेमकं कसं दुर्घटनाग्रस्त झालं त्याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये 14 जण प्रवास करत होते. त्यापैकी तीन जण गंभीर जखमी आहेत.