Bharat biotech new Guidelines | 'कोवॅक्सीन'संदर्भात भारत बायोटेककडून नव्या गाईडलाईन्स जारी
मुंबई : भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन लसीसंदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये कंपनीने काही विशिष्ट आजारांवर उपचार घेणाऱ्यांनी ही लस घेऊ नये, असं स्पष्ट केलं आहे. गरोदर महिला, किमोथेरपीसारखे उपचार सुरु असणारे रुग्ण, रक्त पातळ करण्यासाठी औषध घेणारे रुग्ण यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, भारत बायोटेकच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्समुळे मात्र संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
कोरोनावरील प्रभावी लस येणार असं ज्यावेळी सांगण्यात येत होतं. त्यावेळी ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच, फ्रंट लाईन वर्कर्स यांच्यापाठोपाठ आजारी रुग्णांना देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता भारत बायोटेकच्या वतीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या असून त्यामधून काही आजार असणाऱ्या, तसेच गरोदर महिलांनी लस घेऊ नये असं स्पष्ट केलं आहे.