एक्स्प्लोर
Aditya Thackeray Ayodhya Daura : ठाकरेंची अयोध्यावारी, शरयूकाठी जय्यत तयारी ABP Majha
शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी आदित्य वर्षा बंगल्यावरुन रवाना झाले आणि मुंबई विमानतळावर पोहोचलेत..आदित्य ठाकरेंच्या अयोध्यावारीसाठी हजारो शिवसैनिकही अयोध्येत पोहोचलेत. नाशिकहून ट्रेनने निघालेले हजारो शिवसैनिक तब्बल ३५ तासांनंतर आज पहाटे अयोध्येत पोहोचले. अयोध्या स्थानकात पोहोचताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हजारो शिवसैनिकांसह कालच अयोध्येत दाखल झालेत. आदित्य ठाकरेंच्या अयोध्यावारीची जोरदार तयारी शिवसेनेनं केलीय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















