एक्स्प्लोर
Gondia मध्ये 120 विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये कोंबल, श्वास गुदमरल्याने काही विद्यार्थी बेशुध्द
गोंदियातून एक संतापजनक घटना समोर आलीय.. गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील १२० विद्यार्थ्यांना एका ट्रकमध्ये कोंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका ट्रकमध्ये इतक्या विद्यार्थ्यांना कोंबल्याने श्वास गुदमरुन काही विद्यार्थी बेशुद्ध झालेत.. या विद्यार्थ्यांना एकोडी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. एका विद्यार्थिनीला गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलंय.. या विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत खेळण्यासाठी ट्रकमधून नेण्यात आलं.. कोयलारी इथून परतत असताना विद्यार्थी बेशुद्ध झाल्याचं समोर आलंय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती


















