Mumbai : Don Dawood Ibrahimचा पुतण्या Sohail Kaskar मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार
मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पाकिस्तानात पळून गेलेल्या डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्यादेखिल आता पोलिसांच्या हातून निसटलाय. दाऊदचा पुतण्या सोहेल कासकर हा पाकिस्तानला परत गेल्याची माहिती मिळतेय. अंमली पदार्थ दहशतवाद प्रकरणात अमेरिकेच्या यंत्रणांनी सोहेल कासकरला अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलीसांनी त्याच्या भारतातल्या प्रत्यार्पणासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. मात्र पाकिस्तानातल्या एका कॉल इंटरसेप्शनमध्ये भारतीय यंत्रणांना सोहेल कासकरचा आवाज ऐकू आला होता. त्यानंतर चौकशी केल्यानंतर सोहेल कासकर अमेरिकेतून पाकिस्तानाता गेल्याची माहिती मिळालेय. अमेरिकेनं सोहेल कासकरला भारताकडे सुपूर्द करण्याऐवजी पाकिस्तानाता जाण्याची मुभा कशी दिली याचं उत्तर मात्र मिळू शकलेलं नाहीये.



















