Sambhajinagar Tourism : मराठवाडा तहानेनं व्याकूळ, पर्यटनस्थळांना बसला दुष्काळाचा फटका
छत्रपती संभाजीनगरला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. जागतिक स्तरावर वेरूळ अजिंठा लेण्यांचं वैभव संभाजीनगरला लाभलेला आहे. मात्र या लेण्यांनाही आता दुष्काळाचा सामना करावा लागतोय. नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले आहेत, त्यामुळे वेरूळ, अजिंठा लेणी, दौलताबादचा, किल्ला या सर्व ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा करण्याची वेळ पर्यटन विभागावर आली आहे. त्यामुळे आपणही संभाजीनगरला पर्यटनासाठी जात असाल तर सोबत पाणी ठेवा.असं आवाहनही पर्यटकांना करण्यात येतंय.
याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी.
परभणी जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तर पूर्णा तालुक्याच्या कमलापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट राहिल्याने तिथल्या गावांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता..