Shiv Senaमधील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश,8 ऑगस्टपर्यत म्हणणं मांडण्याची मुदत
बंडखोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. असं असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना नेमकी कुणाची याचा फैसला आता थेट केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठा वाद सुरु झालाय. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांना आव्हान देत भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून खरी शिवसेना आपणच असल्याचा दावा करण्यात येतोय. आता याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे. सेनेच्या दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत म्हणणं मांडण्याची मुदत देण्यात आलीय..दोन्ही बाजूंचे दावे ऐकल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे...






















