Aurangabad Crime : औरंगाबादमध्ये प्रसिद्ध उद्योजक नित्यानंद भोगले यांना गुंडांची मारहाण ABP Majha
महाराष्ट्रात उद्योगधंदा करणं गुन्हा आहे का? हा सवाल उपस्थित होण्यामागचं कारण आहे औरंगाबादमध्ये प्रसिद्ध उद्योजकांवर गुंडांनी केलेला हल्ला... शहरातले प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांच्या भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दहा ते पंधरा गुंडांनी प्रवेश करून कंपनीचे सीईओ नित्यानंद भोगले यांना मारहाण केली. आणि या घटनेचं सीसीटीव्हीत फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलंय. एक कर्मचारी पूर्ण क्षमतेनं काम करत नसल्यानं त्याला दुसरं काम दिलं. त्या रागातून टोळक्यानं कंपनीत येऊन असा हल्ला केला. या प्रकारामुळे औरंगाबादमधल्या दादागिरी आणि गुंडगिरीच्या वाढत्या प्रकारांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. शहरातल्या उद्योजकांनी या प्रकारांबद्दल चिंता व्यक्त करून गुंडगिरीला वेळीच आवर घालण्याची मागणी केलीय.




















