एक्स्प्लोर
Train Accident In Aurangabad | 16 मजुरांना मालगाडीने चिरडलं, पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांकडून दु:ख
राज्यात कोरोनाचा विळखा वाढतच जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे अनेक मजूर देशभरातील अनेक राज्यांत अडकून पडले आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे अनेक मजुरांनी पायी प्रवास करणं पसंत केलं आहे. अशातच कोरोनाच्या संकटात मजुरांशी संबंधित एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. महाराष्ट्रातील औंरगाबादमध्ये मालगाडीच्या धडकेत 14 मजुरांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. रेल्वे रूळावरून पायी जात असताना मालगाडीने या मजुरांना धडक दिली. जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ हा अपघात घडला. हे सर्व मजूर जालन्यातून भुसावळला जात असतानाच पहाटे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















