Oxygen Plant | हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या सिग्मा रुग्णालयातील प्लांट कसं आहे?
कोरोनाच्या वाढत्या प्रदुभवामुळे सध्या महाराष्ट्रात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता आहे. पण औरंगाबाद मध्ये एक असं रुग्णालय आहे जे स्वतः हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करते. त्यामुळे हे रुग्णालय ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण आहे. ऑक्सिजनची निर्मिती करणारा हा प्लांट उभारण्यासाठी सुरुवातीला मोठी गुंतवणूक करावी लागते. मात्र या प्लांटा फायदाही मोठा आहे. आज त्याच्या चार रुग्णालयाला ऑक्सिजनसाठी धावपळ करण्याची गरज नाही. ऑक्सिजन प्लांटची माहिती आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनीही घेतली आहे. कशी होते हवेतून ऑक्सिजनची निर्मिती? या प्लांट उभारण्यासाठी खर्च किती? महाराष्ट्रातील इतर शासकीय आणि खासगी रुग्णालय असा प्लांट उभा करु शकतात का? याविषयी सांगत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे























