एक्स्प्लोर
Aurangabad : रिक्षा चालकाकडून तरुणीची छेड, चालत्या रिक्षातून उडी, तरुणीच्या डोक्याला दुखापत
#ABPMajha #Aurangabad #MarathiNews औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी.. रिक्षाचालकानं छेड काढल्यानं एका अल्पवयीन तरुणीनं चालत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना समोर आलेय. औरंगाबादच्या सिल्लेखाना चौक भागातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. तरुणी रिक्षात एकटीच असल्याचं पाहून रिक्षाचालकानं तिच्यासी अश्लील भाषेत बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे घाबरून या तरुणीनं रिक्षातून उडी मारली.. या घटनेत तिच्या डोक्याला मार लागला असून औरंगाबादच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी अकबर हमीद सय्यद याला पोलिसांनी अटक केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























