एक्स्प्लोर
Majha Impact: औरंगाबादच्या 'बामू' विद्यापीठाला जाग, पहिल्या वर्षाचे B.Com चे 700 विद्यार्थी उत्तीर्ण
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं बी.कॉमच्या पहिल्या वर्षातील मुलांच्या निकालाचा खेळखंडोबा केला होता. कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विषयात जवळपास 700 विद्यार्थ्यांना सुरुवातीला नापास करण्यात आलं. पुन्हा एकदा पास करण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा नापास करण्यात आलं. एबीपी माझानं विद्यार्थ्यांच्या या समस्येला बातमीच्या स्वरुपात सर्वात आधी वाचा फोडली होती. अखेर विद्यापीठ प्रशासनाला आता जाग आली आहे. बी. कॉमच्या पहिल्या वर्षातील 700 विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आलं आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















