नवी दिल्ली : नमो अॅप युझर्सचा डेटा अमेरिकन कंपन्यांकडे, राहुल गांधींचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Mar 2018 08:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फेसबुकच्या डेटा लीकनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपवरही डेटा विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत हा आरोप केला.
राहुल गांधी यांनी फ्रान्समधील एका हॅकरच्या ट्वीटच्या आधारवर बातमी शेअर केली. नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करणाऱ्या युझर्सचा डेटा थर्ड पार्टीला विकला जात असल्याचा दावा एलियट एल्डरसन या हॅकरने केला.
राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधत ही बातमी शेअर केली आणि डेटा विकला जात असल्याचा आरोप केला. ‘माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. तुम्ही माझ्या अधिकृत अॅपवर लॉग इन करता तेव्हा तुमची सर्व माहिती मी माझ्या अमेरिकन कंपनीतील मित्रांना देतो’, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं.