नवी दिल्ली : आप विरुद्ध आयएएस : 'आप'च्या नेत्या अल्का लांबा यांच्याशी बातचीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उपराज्यपालांच्या कार्यालयाबाहेर सुरु असलेल्या उपोषणादरम्यान दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चार महिन्यांपूर्वी दिल्लीच्या सचिवालयात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना धक्काबुक्की केली होती. यानंतर दिल्लीच्या आयएएस अधिकाऱ्यांनी सरकारशी असहकार पुकारला. त्यांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे दिल्लीचं कामकाज ठप्प झालं. या सगळ्या प्रकरणात उपराज्यपाल अनिल बैजल यांनी हस्तक्षेप करुन आयएएस अधिकाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश देण्याची मागणी आपनं केलीय. त्यासाठी बैजल यांच्या कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, गोपाल राय आणि सत्येंद्र जैन यांनी उपोषण सुरु केलंय. ज्याला खुद्द पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी, आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी पाठिंबा दिलाय. तसंच पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केलीय.