नवी मुंबई : संरक्षण दलातील लोकांची फसवणूक करणारा बिल्डर अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संरक्षण दलातील लोकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला नवी मुंबईच्या क्राईम ब्रांचने अटक केली आहे. शैलेंद्र दावडा असं आरोपीचं नाव आहे. दावडाने पनवेलमधील मौजे विहिगर येथे प्रोजेक्ट उभारणास असल्याचे सांगितले होते. भूखंडावर कमांडर्स गेट वे या नावाने फ्लॅट आणि रो हाऊस बंगलोच्या बांधकामाकरीता संबंधित प्राधिकरणाकडून परवानग्या घेण्यात आल्या असल्याचे दावडे सांगत होता. दावडेने बुकिंगधारकांकडून बुकिंगची रक्कमही स्वीकारली होती. मात्र कुठेही कोणत्याही प्रोजेक्टचे काम सुरु नव्हते. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नौदलाचे कमांडर मनिष जोशी यांनी खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.