नाशिक : गॅस्ट्रोसदृश्य आजाराने जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू

Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यात गॅस्ट्रोसदृश्य आजाराने तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही सुरगाणा तालुक्यातील राहुडे गावाचे रहिवासी होते. बशीराम पांडू लिलके, सीताराम जीव पीठे, नवसु वाळू पवार अशी मृत पावलेल्या तिघांची नावं आहेत. या तीनही ज्येष्ठ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील गॅस्ट्रोसदृश्य आजारामुळे मृत्यू पावलेल्या मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. याआधी रविवारी राहुडे गावातील नामदेव गांगुर्डे यांचा तर कळवण तालुक्यातील विरशेत गावच्या मंगला जाधव यांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram