Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार
Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार
हेही वाचा :
कारखान्यासाठी कर्ज डावल्याने अशोक पवारांनी (Ashok Pawar) अजित पवारांना (Ajit Pawar) चॅलेंज केले आहे. 'एनएसडीसी'कडे (NSDC) सादर केलेल्या कर्जाच्या फाईल मध्ये त्रुटी असतील तर संबंधितांनी दाखवाव्यात. माझी कर्जाची फाईल 100% बरोबर आहे. मी समोरासमोर बसून चर्चा करेन असे आव्हान अशोक पवारांनी दिले. मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणार असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दात अशोक पवारांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली. केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी राज्यातील १३ कारखान्यांना एनएसडीसीकडून कारखान्यांना 1800 कोटींहून अधिक मर्जीचे कर्ज देण्यात आले होते. यामध्ये विरोधी पक्षात असणाऱ्या कारखान्यांना कर्ज डावलले गेल्याचा आरोप होत असून पुण्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.