Pradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय?

Continues below advertisement

Pradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय? वस्तुस्थितीशी कोणताही संबंध नसतांना खोट्या अफवा जेव्हा समाजमाध्यमावर पसरवल्या जातात व त्या अफवांची कसली हि चौकशी न करता त्यावर सामान्य नागरिक  विश्वास ठेवतात तेव्हा आंदोलनाचा कसा भडका उठतो,हे आम्ही दीक्षाभूमी येथील आंदोलनाच्या रूपाने अनुभवले असे स्वता दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांनी सांगितले.   दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनाआधी अंडरग्राऊण्ड ग्राऊण्ड पार्किंगचा नागपूर मेट्रोशी कोणताही संबंध नसतांना फक्त अंडर ग्राऊण्ड पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षेसाठी आणलेल्या बॅरिकेट्स वर नागपूर मेट्रो लिहिले होते त्यामुळे हि पार्किंग नागपूर मेट्रोला दिली जाईल हि अफवा फसरवण्यात काही समाजकंठक यशस्वी झाल्याचे स्मारक समितीचे अध्यक्ष प्रदीप आगलावे यांनी सांगितले.   त्यानंतर दिक्षभूमीची जागा दीक्षाभूमीच्या नावावर नाहीच हि अफवा पसरवण्यात आली.  अंडरग्राऊण्ड पार्किंग मुळे मुख्य स्तूपाला तडे जाईल हि अफवा पररवण्यात आली.  यामुळे दिक्षमूमीवर आंबेडकर अनुयायांचा भडका उडाला मात्र दीक्षाभूमी विकास प्रकल्प हे आंतराष्ट्रीय दर्जाचे आर्किटेक कडून करून घेतले आहे, व्हीएनआयटी सारख्या संस्थेकडून ते तपासून घेण्यात आले व गेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला हे लाखो लोकांसमोर मांडण्यात आले होते त्यामुळे याची कोणाला कल्पना नव्हती हा आरोप स्मारक समितीने फेटाळून लावला आहे.  स्मारक समितीवर आंबेकरी अनुयायांची इतकी नाराजी का ? या संदर्भात स्मारक समितीचे सदस्य डॉ प्रदीप आगलावे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram