नागपूर : आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा दुसरा दिवस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपुरात संघ परिवाराचं मंथन दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. आजच्या बैठकीत संघाच्या सरकार्यवाहपदाची निवडणूक होणार आहे. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे ही निवडणूक होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रय होसबळेंची वर्णी लागू शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सरसंघचालकानंतर सरकार्यवाह हे दुसरं मोठं पद असतं.या निवडीनंतर संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल.