मुंबई : राज्यात पेट्रोल 2 रुपये, तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त : सुधीर मुनगंटीवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केंद्र सरकारच्या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये दोन रुपयांचा कपात करत सर्वसामान्यांना दिलासा दिला. त्यामुळे राज्यात पेट्रोल दोन रुपये तर डिझेल एक रुपयांनी स्वस्त झालं. आज रात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. यामुळे 2015 कोटींची घट राज्याला अपेक्षित आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आधी गुजरात सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली. गुजरात सरकारनं व्हॅटमध्ये 4 टक्क्यांनी कपात केल्यामुळे पेट्रोल 2.93 रुपये, तर डिझेल 2.72 रुपयांनी स्वस्त झालंय. त्यातुलनेत महाराष्ट्रात मात्र एक रुपयांचा कमी दिलासा मिळाला.