Sadhvi Pragya | बसायला न मिळाल्याने साध्वी प्रज्ञांचा कोर्टात थयथयाट | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजारी असूनही कोर्टात बसायला नीट जागा मिळाली नाही म्हणन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाची कारवाई संपल्यावर साध्वी प्रज्ञा यांचा कोर्टात तळतळाट पाहायला मिळाला. कोर्टात उपस्थित झाल्यापासून सलग चार तास साध्वी कोर्टरुममध्ये उभ्या होत्या.
कोर्टातील मोडक्या खुर्च्या, धुळीने माखलेल्या खिडक्या अशा वातावरणात मला कोणतीही रिअक्शन झाली तर जबाबदार कोण? असा सवालही साध्वी प्रज्ञा यांनी विचारला आहे. माझी वैद्यकीय स्थिती योग्य नसूनही, मला इथं बोलावलं गेलंय, केवळ वकील बोलत आहेत, तर मग मला का बसवून ठेवलंय?, असा संतप्त सवाल साध्वीने तिच्याच वकिलांना केला आहे.