एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपकडून राणेंचा पत्ता कट, प्रसाद लाड यांना उमेदवारी
शिवसेनेचा कडवा विरोध, हिवाळी अधिवेशन आणि गुजरात निवडणुकांच्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा विधानपरिषेदतला पत्ता कट झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आयात झालेल्या प्रसाद लाड यांना लॉटरी लागली आहे.
विधानपरिषद पोटनिवडणुसाठी भाजपकडून प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळाली आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रसाद लाड उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने प्रसाद लाड यांना पाठिंबा दिला आहे.
पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement