मुंबई : अभिनेते जितेंद्र यांनी माझा लैंगिक छळ केला, चुलत बहिणीचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Feb 2018 12:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वादापासून नेहमी दूर असलेले ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र वयाच्या 75 व्या वर्षी वादात अडकले आहेत. जितेंद्र यांच्यावर त्यांच्या चुलत बहिणीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
जितेंद्र यांच्याविरोधात हिमाचल प्रदेशमधील पोलिस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण 47 वर्षापूर्वीचं असल्याचं समजतं आहे.
पीडित महिलेने त्या घटनेनंतर अनेक वर्ष आपण त्या धक्क्यात असल्याचं म्हटलं आहे. मात्र अत्याचार झालेल्या मुली समोर येऊन तक्रार दाखल करत आहेत. यातूनच हिंमत मिळाली असून अत्याचाराविरोधात तक्रार दाखल केल्याचं पीडित महिलेनं म्हंटलं आहे. महिलेने पोलिसांना तिची ओळख उघड न करण्याची विनंती केली आहे.