मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी पुन्हा वेगळा गुन्हा नोंदवू नये, भुजबळांच्या वकिलांची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ आज पीएमएलए कोर्टापुढं हजर झाले. इडीनं या प्रकरणात पहिल्यांदाच आरोपपत्र दाखल केलं आहे. पुरवणी आरोपपत्रात या प्रकरणाचा समावेश केल्यानं याचा वेगळा गुन्हा म्हणून विचार करु नये अशी मागणी भुजबळांच्य़ा वकिलांनी न्यायालयात केली. भुजबळ सध्या जामिनावर सुटले आहेत. त्यामुळं वेगळा गुन्हा नोंदवून त्यांना पुन्हा जामीन घेण्यास सांगता येणार नाही असा युक्तिवाद भुजबळांच्या वकिलानं केला.