मुंबई : मुसळधार पावसामुळे कोणत्या रेल्वे गाड्या रद्द? कोणत्या गाड्यांचा मार्ग बदलला?
Continues below advertisement
कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. कुडाळच्या माणगाव खोऱ्यातील नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अंबेरी पुलावरुन पाणी वाहत आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यानं 27 गावांचा संपर्क तुटला असून, या मार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. तर खेडमध्ये जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पुलावरील वाहतूक थांबवण्यात आलीय. सावित्री नदी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खेडमध्ये ठप्प झालीय.
Continues below advertisement