Teachers Strike | शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार, संपामुळे लातूरमधील शाळा बंद | ABP Majha
Continues below advertisement
राज्यभरातील बहुतांश शाळा आज बंद आहेत. कारण 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना त्याआधीची पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी संप पुकारला आहे. नोव्हेंबरनंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील सर्व भत्ते लागू करावेत, कंत्राटी धोरण रद्द करुन या कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासारख्या दहा मागण्या मांडण्यात आल्या. आज मंत्रिमंडळाची बैठक असून याच बैठकीत हा निर्णय व्हावा अन्यथा पुन्हा आचारसंहितेचा अडसर निर्माण होईल, अशी या शिक्षकांची भावना आहे.
Continues below advertisement