लातूर: अविनाश चव्हाण हत्या: खासगी शिकवणी चालकांशी बातचीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लातूरमध्ये खासगी शिकवणी चालक अविनाश चव्हाण यांचा खून झाल्यानंतर शिकवणीच्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशांची जोरात चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रातल्या सर्वच प्रमुख शहरांमध्ये शिकवणीचा धंदा जोरात सुरू आहे. बेरोजगार असलेले अनेक तरुण आणि पैशाच्या हव्यासाने नोकऱ्या सोडून दिलेले प्राध्यापक शिकवण्या घेतात. एकीकडे महाविद्यालये ओस पडली आणि शिकवण्या फुल्ल झाल्या असंच महाराष्ट्रात चित्र आहे. अनेक वेळेला या शिकवण्या संदर्भात चर्चा झाली. आजची आधी केलेली चर्चा मात्र वेगळी आहे. खासगी शिकवण्या चालतात कसा, चालवतो कोण, किती पैसे जमा होतात , कोणाला किती खंडणी द्यावी लागते का द्यावी लागते आशा मुद्यावरती खासगी शिकवणी चालकांना आम्ही बोलते केले.