मुंबई : कुर्ल्यातील एका घरात भीषण आग, आठजण भाजले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पवईतल्या आगीनंतर कुर्ल्यातही एक आगीची घटना समोर येतेय. कुर्ला ठक्कर बप्पा इथल्या एका घरात भीषण आग लागल्याचं समोर आलंय. या आगीत एकूण ८ जण जखमी झाले आहेत. जगदीश जाटोलिया यांच्या घरी चप्पल बनवण्याचं काम सुरु असताना अचानक ही आग लागली. यात २ महिला, ४ लहान मुलं आणि एक साडेतीन महिन्याचा चिमुकला जखमी झाला आहे. तर २ पुरुष भाजल्याची माहिती मिळतेय. सर्व जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. दरम्यान, आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या मात्र, तत्पूर्वीच आग विझवण्यात स्थानिकांना यश आलं.