कोल्हापूर : कुस्तीचा डाव तरुणाच्या जीवावर, निलेश कंदूरकर अवघड डावात जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापूर जिल्ह्यातल्या बांदिवडे गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती सामन्यात एक पैलवान गंभीर जखमी झाला. निलेश कंदूरकर असं त्या जखमी पैलवानाचं नाव आहे. निलेश कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरला. प्रतिस्पर्ध्यानं निलेशला आपल्या कवेत धरलं आणि मग उचलून खाली जमिनीवर आपटलं. त्यावेळी निलेश जमिनीवर निपचित पडला आणि त्याच्या मानेच्या शिरेला दुखापत झाली. त्यानंतर उपचारासाठी त्याला कोल्हापुरातल्या खाजगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं.