कर्नाटकचा सत्तासंघर्ष : 'ऑपरेशन कमळ', आशिष शेलार स्पेशल चार्टर्ड विमानाने बंगळुरुला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्नाटक विधानसभेत आज भाजपचा कस लागणार आहे. आज दुपारी 4 वा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करायचं आहे. सुप्रीम कोर्टाने राज्यपालांनी दिलेली 15 दिवसांची मुदत अमान्य करत, आज दुपारीच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले.
कर्नाटकात आज सत्ता स्थापनेच्या निर्णायक टप्प्याला 'ऑपरेशन कमळ' असं नाव दिले आहे. या स्पेशल ऑपरेशन टीममध्ये पक्ष श्रेष्टींकडून महाराष्ट्रातून आमदार आशिष शेलार यांना पाचारण करण्यात आलं आहे.
सत्तेची जुळवाजुळव करण्यासाठी आशिष शेलार आज सकाळी बंगळुरूच्या दिशेने स्पेशल चार्टर्ड विमानाने रवाना झाले आहेत.