सातारा : कराडमध्ये नोटाबंदी आणि जीएसटीला वैतागून सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Mar 2018 11:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सातारा : जीएसटी आणि नोटाबंदीला कंटाळत असल्याची फेसबुक पोस्ट टाकून एका सराफा व्यापाऱ्याने आत्महत्या केली. कराड शहराजवळ रेल्वेखाली उडी घेऊन राहुल फाळके यांनी आत्महत्या केली. राहुल फाळके हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते.
भविष्यात कुटुंबीयांकडे आणि शिवसेनेकडे लक्ष देण्याचंही आवाहन राहुल फाळके यांनी फेसबुक पोस्टमधून केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इतर नेत्यांसारखे थापा मारणारे नाहीत, त्यांना मन आहे, जनतेच्या वेदना समजतात. त्यामुळे शिवसेनेला निवडून द्या, असं आवाहन राहुल फाळकेंनी केलं.
राहुल फाळके यांचं कराडमधील अहुजा चौकात सराफा दुकान आहे. त्यांचं लग्न झालेलं असून दीड वर्षांची मुलगी आहे. कराडजवळील वनवास माची हे त्यांचं गाव आहे.