औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी आणखी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अजून दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी इथे 60 वर्षीय जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन केलं. सध्या त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे तर याच गावात एका तरुणाने पुलावरुन कोरड्या नदीपात्रात उडी मारली. गुड्डू सोनावणे असं या तरुणाचं नाव आहे. सुरुवातीला त्याला देवगाव रंगारीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं, नंतर मात्र त्याला घाटीला हलवलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram