सिंधुदुर्ग : कणकवलीसह सहा नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी, राणेंची प्रतिष्ठा पणाला
Continues below advertisement
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीसह राज्यातील 6 सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. यामध्ये
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि देवरुख, सिंधुदुर्गच्या कणकवली, जळगावच्या जामनेर, कोल्हापुरातील आजरा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगरपरिषदेचा समावेश आहे.
कणकवलीत भाजपाच्या कोट्यातून राज्यसभा खासदार झालेले नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि भाजप-शिवसेना युतीमध्ये ही याठिकाणी लढत होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिले आहे. नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीतील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे.