Siddharth Shukla Death : Fitness Proteins च्या अतिरेकामुळे सिद्धार्थ शुक्लाला ह्रदयविकाराचा झटका?
Sidharth Shukla Death News Live : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झालं आहे. परंतु मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हृदय विकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खंर कारण कळू शकेल. मुंबईच्या कूपर रूग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकूल आहेत.
![Beed Sarpanch Case Special Report : बीडचं बिहार, आरोप बेसुमार! अंजली दमानियांची एन्ट्री, आरोपांची फायरिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/25/20fb9339b942c417b6a1111f6050db5b17350882378251000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Khupte Tithe Gupte : 'खुपते तिथे गुप्ते'च्या ट्रोलिंगबद्दल अवधूतला काय वाटतं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/3ba2cbd63d36e4169239665abd91bf761688224052532308_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Remote Majha : जेव्हा नवऱ्याचीच चोरी होते...'जीव माझा गुंतला'च्या सेटवर रिमोट माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/fe0b2db0e4ae5e82686f7018264dbb8f1687630130697308_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Remote Majha : नवा गडी, नवं राज्य मालिकेच्या सेटवर- रिमोट माझाचं नवं पर्व](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/461331b9fb2f2f0a524e1603fdf1c6381687629950986308_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Movie Poster Boys : पोस्टर बॉईज 2 सिनेमाचं दादर प्लाझा इथं 25 फूट उंचीचे पोस्टर झळकलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/21/a00b9168b3634e3e4b61709f5c9972101682061477967308_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)