Shahrukh Khan Meets Aryan: कारागृहात मुलाला पाहून भावूक झाला शाहरुख खान, शाहरुख म्हणाला, तू काही खाल्लंस का?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShahrukh Khan Meets Aryan: क्रूझ पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा अर्ज काल सत्र न्यायालयाकडून फेटाळला गेला. एनसीबीनं अटक केल्यापासून आर्यन खानला आपल्या कुटुंबियांचा चेहरा पाहता आला नव्हता. मात्र आज स्वतः शाहरुख खाननं आर्थर रोड कारागृह गाठत मुलगा आर्यनची भेट घेतली. यावेळी दोघेही भावूक झाल्याची माहिती मिळाली आहे. आर्यनला भेटल्यानंतर शाहरुखनं त्याला काही खाल्लस का? असं विचारलं. आर्यननं 'नाही' असं उत्तर देताच शाहरुखनं कारागृह अधिकाऱ्यांना आम्ही आर्यनला काही खाण्यासाठी देऊ शकतो का अशी विचारणा केली. मात्र अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या नियमांकडे बोट दाखवलं.
Shahrukh Khan : शाहरुख खाननं घेतली मुलाची भेट, आर्थर रोड कारागृहात दहा मिनिटांचा संवाद
शाहरुखनं जवळपास 10 मिनिटं शाहरुख आणि आर्यन खानमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आर्यन खानचा आर्थर रोड कारागृहातला मुक्काम मंगळवारपर्यंत वाढला आहे. काल सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर आर्यनच्या जामिनीसाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. मात्र न्यायालयात आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास शाहरुख किया कारमधून आर्थर रोड कारागृहात दाखल झाला. कोरोनाच्या काळात कारागृहातील कैद्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी बंदी घातली होती. मात्र आजपासून हे निर्बंध उठवण्यात आल्यामुळं शाहरुखला मुलगा आर्यन खानला भेटता आलं.