NCBचं पथक थेट Shahrukh Khanच्या मन्नत बंगल्यावर, सर्च ऑपरेशन सुरु

Continues below advertisement

NCB at Shahrukh Khan Home : मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. अशात एनसीबीकडून याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. अशातच आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी छापा टाकला, अशी माहिती मिळाली होती. परंतु, एनसीबीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं. 

 

आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून बॉलिवूडच्या आताच्या यंग सिनेकलाकारांमधील प्रसिद्ध अशा अनन्या पांडेच्या घरीही छापेमारी करण्यात आली. याशिवाय, दुपारी 2 वाजता अनन्या पांडेला चौकशीसाठी एनसीबीनं समन्स बजावलंय. त्यामुळे एनसीबी बॉलिवूडमधील आणखी कोण-कोणत्या बड्या चेहऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सिनेसृष्टीसह सामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram