एक्स्प्लोर
Raj Thackeray Supports Adipurush : आदिपुरुष सिनेमा आणि ओम राऊतांना मनसेचा पाठिंबा
आदिपुरुष सिनेमावरुन सध्या देशभरात वातावरण तापलंय.. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपच्या काही नेत्यांनी विरोधाचा सूर आळवलाय.. भाजप आमदार राम कदमांनीही या सिनेमाला विरोध दर्शवलाय.. आता या वादात मनसेनं उडी घेतलीय. मनसेनं आदिपुरुष सिनेमा आणि दिग्दर्शक ओम राऊतांना पाठिंबा दर्शवलाय. घाणेरड्या राजकारणासाठी तरुण दिग्दर्शकाचं खच्चीकरण करु नका असा सल्ला मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भाजपच्या राम कदमांना दिलाय. विरोध करणाऱ्यांनी रावण पाहिलाय का असा सवालही खोपकरांनी विचारलाय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















