पोलिसांचे आभार मानण्यासाठी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याकडून आमरस पुरीचा बेत
Continues below advertisement
कोरोना व्हायरसच्या संकटाविरुद्ध आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीसही जीवाची बाजी लावून लढत आहेत. पोलीस दिवस-रात्र रस्त्यावर बंदोबस्तासाठी आहेत. त्यातच कोरोनाची सर्वाधिक लागण पोलिसांमध्ये झालेली दिसते. या कोरोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी खास बेत आखला होता. हा बेत म्हणजे आमरस-पुरीचा. पोलिसांनीच याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.
Continues below advertisement