Uddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहन
Continues below advertisement
राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी-मराठा असा वाद सुरू आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मराठा समाजाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे, तर मराठांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता, स्वतंत्र आरक्षण द्या, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी मांडली आहे. दरम्यान, राज्यातील ओबीसी-मराठा वादावरून आता उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावरून भाजपा शिंदे गटावर सडकून टीकाही केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथील मेळाव्यात बोलत होते.
Continues below advertisement