![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Lok Sabha Opinion Poll : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसणार - C Voter
Lok Sabha Election Opinion Poll 2024 : लोकसभा 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात (Maharashtra) महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या ओपिनियन (ABP & C-Voter Survey ) पोलनुसार महायुतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीच्या (maha vikas Aghadi) पारड्यात 26 ते 28 जागा पडण्याचा अंदाज आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही महायुतीला फारसं यश मिळताना दिसत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार, असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 37 टक्के तर महाविकास आघाडीला 41 टक्के मतं मिळू शकतात. देशातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जवळ आल्या आहेत. तीन ते चार महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. भाजप (BJP) आणि काँग्रेससह (Congress) देशभरातील इतर पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यादरम्यान सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलेय. लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर कोणाचा विजय किंवा पराभव झाला असता असा प्रश्न विचारण्यात आला. देशातील पाच मोठ्या राज्यांतील जनमत चाचण्यांचे आकडे धक्कादायक आहेत. पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांचा समावेश करून लोकसभेच्या एकूण 223 जागा आहेत. या जागांवरच्या विजयामुळे देशात कोणाची सत्ता येणार हे ठरते. महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
![Maharashtra Cabinet Expansion : महायुतीचा शपथविधी, राष्ट्रवादीचे 9 मंत्री नव्या मंत्रिमंडळात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/15/688620ce18cde357eec51299c0cdb1af1734277641630718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शन कशी होणार? काय आवश्यक?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/f4d1b5d3bbbffed3defc411b1662060a173400483075890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Murlidhar Mohol on One Nation One Election : लोकशाही सशक्त करणारा निर्णय : मुरलीधर मोहोळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/17e9976d8306dad9b233613e35d54e5a173400152247190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![One Nation One Election विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; Vinay Sahasrabuddhe यांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/a4685b635c40f04dac70b63524fbd810173399862907090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Markadwadi Politics:ईव्हिएम विरुद्ध बॅलेट, शरद पवारांची हजेरी, मारकडवाडीत घडतंय काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/08/eb2530ba100cd4dbc2c20889e63ab7761733680693587976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)