Devendra Fadanvis PC : महाविकास आघाडीच्या भोंगळ कारभाराला जनतेनं आरसा दाखवला : देवेंद्र फडणवीस
या निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'करेक्ट कार्यक्रमा'ची भाषा केली होती. या विजयानंतर या 'करेक्ट कार्यक्रमा'ची देखील चांगलीच चर्चा सुरु आहे. 'समाधान आवताडे यांना विजयी करून इथला कार्यक्रम करा, मी सरकारचा संपूर्ण 'करेक्ट कार्यक्रम' करतो असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या वक्तव्यानंतर पुन्हा सत्ताबदलाच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र 105 आमदारांमध्ये समाधान आवताडे यांची एकाची भर पडल्यानंतर हा 'करेक्ट कार्यक्रम' फडणवीस कसे करणार? असा सवाल केला जातोय. मात्र आवताडे यांच्या विजयानंतर फडणवीसांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आज पुन्हा फडणवीस यांनी योग्यवेळी सरकारचा कार्यक्रम करायचा आहे. पण आता लक्ष कोरोनावर आहे, असं म्हणत भाष्य केलं.






















