Devendra Fadnavis On Lok Sabha : महाराष्ट्रात विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवू, बहुमताने निवडून येणार
महाराष्ट्रात विजयाचा रेकॉर्ड काय ठेवू आणि देशात बहुमताने निवडून येवू, तसंच सातही जागा भाजप जिंकेल, एबीपी माझाशी बोलताना देवेंद्र फडणवीसांचा दावा.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रचाराची धामधुम आटोपून त्यांनी आज राजधानी दिल्ली गाठली आणि दिल्लीतील चांदणी चौकात रोड शो घेतला. भाजप उमेदवार प्रवीण खंडेलवाल यांच्यासाठी रामनगर भागात प्रचारात ते सहभागी झाले. दिल्लीत सातही जागा भाजप जिंकेल, महाराष्ट्रात विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवू आणि देशात बहुमताने निवडून येवू, असा विश्वास फडणवीसांनी एबीपी माझाशी बोलताना केला. त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता फडणवीसांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेला संबोधित केलं.
- महाराष्ट्रात आम्ही आमचा रेकॉर्ड कायम ठेवू
- देशभरात आम्ही बहुमताने निवडून येतोय
- दिल्लीत सातच्या सातच्या जाग आमच्या निवडून येतील
- दिल्लीत प्रचार जोरदार सुरू आहे
- देशभरात उत्साहाचे वातावरण आहे























