Navi Mumbai : 15 दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाच आरोपी ताब्यात, नवी मु्ंबई पोलिसांची कारवाई
नवी मुंबईतील सिवूड्स मॉलसमोर 15 दिवसांपूर्वी ब्रिजेश पाटील या तरुणावर पाच ते सहा जणांनी जीवघेणा हल्ला केला, भर रस्त्यात तरुणावर वार झाल्यानं परिसरात मात्र खळबळ वाढली होती. या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. 2017मध्ये जास्मिन तांडेल आणि फिर्यादी ब्रिजेश पाटील यांच्यात ग्रॅण्ड सेंट्रल मॉलमधील ठेक्यावरुन भांडण झालं आणि याचाच राग मनात धरुन जस्मिन तांडेल यांनी ब्रिजेश पाटील यांना मारायची सुपारी दिली. या दोन आरोपींनी इतर तीन अल्पवयीन आरोपींना घेऊन कोयता आणि सुरीने हल्ला केला. मुख्य आरोपी जस्मीन तांडेल याला अटक करण्यात आली, तर अल्पवयीन आरोपींना बालसुधार गृहात रवानगी केली.
























