Abu Azmi on Pune Encounter : सराईत गुंड शाहरुख शेखचा एनकाऊंटर प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे
Abu Azmi on Pune Encounter : सराईत गुंड शाहरुख शेखचा एनकाऊंटर प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे
पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख उर्फ अट्टी शेख याचा सोलापुरात इन्काउंटर करण्यात आलाय. दुसऱ्यांदा मोक्काअंतर्गत कारवाई झाल्यानंतर फरार असलेला अट्टी शेख हा सोलापुरात एका नातेवाईकांच्या घरात लपून होता. त्याच्या अटकेसाठी गेलेल्या पोलीस पथकवर त्याने गोळीबार गेला. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांची गोळी लागून तो ठार झालंय. या घटनेनंतर संपूर्ण सोलापूरसह पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात देखील खळबळ उडालीय.
कोण आहे हा शाहरुख उर्फ अट्टी शेख?
--
शाहरुख उर्फ अट्टी शेख हा पुण्यातील टिपू पठाण टोळीचा सक्रिय सदस्य होता.
खंडणी, बेकायदेशीर धंदे, दहशत निर्माण करणं, वसुली यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे या टोळीने थैमान घातला होता
पुण्यातील हडपसर, वानवडी, काळेपडळ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत, जबरी चोरी, शस्त्राचा वापर असे अनेक गुन्हे दाखल होते.
जवळपास 15 विविध प्रकरचे गंभीर गुन्हे दाखल आहेत
त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी याच्या आधी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती
येरवडा कारागृहात बाहेर आल्यानंतर देखील त्याचा गुन्हेगारी विश्वात वावर सुरूच होता
काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या काळेपडळ पोलीस ठाण्यात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल होता तर दुसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली
तेव्हा पासूनच कुख्यात गुंड शाहरुख उर्फ अट्टी शेख हा फरार होता























