Rupee Cooperative Bank चा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती
abp majha web team
Updated at:
22 Sep 2022 08:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनियमांचं उल्लंघन आणि आर्थिक अनियमिततांमुळं तोट्यात गेलेल्या रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळं रुपी बँकेच्या खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ८ ऑगस्ट २०२२ रोजीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. या आदेशामध्ये रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याचे आदेश आरबीआयनं दिले होते. पण रुपी बँकेला कायमचं टाळं लागण्याच्या दिवशीच त्या बँकेला दिलासा मिळाला आहे.