Blackbuck Poaching Case : सलमान आणि आसाराम बापू एकाच बराकमध्ये!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी जोधपूरच्या सीजीएम कोर्टाने दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणात सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे या कलाकारांची निर्दोष सुटका केली आहे. कोर्टाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्याचा तुरुंगवास अटळ आहे. सलमानची सेंट्रल जेलमध्ये रवानगी होणार असून तिथे तो आसाराम बापूसोबत राहण्याची शक्यता आहे.