बीड : मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेऊ : मराठा क्रांती ठोक मोर्चात इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jul 2018 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बीडच्या परळीत काल रात्रभरापासून मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. रात्री उशिरा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी मोर्चेकऱ्यांना चर्चेचं आमंत्रण दिलं. मात्र ते निमंत्रण मोर्चेकऱ्यांनी फेटाळून लावलं. आरक्षणासह इतर मागण्या जोपर्यंत अमलात येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेऊ आणि गावागावात ठिय्या देऊ असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला आहे.