Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?
विधानसभेच्या आचारसंहिते मुळे मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण आता नवीन सरकारच्या काळात होणार हे जवळपास निश्चित..
उद्घाटन होण्याचे बाकी असलेल्या 76 किमी लांबीच्या इगतपुरी-आमणे टप्पा जवळपास पूर्ण, मात्र मुंबई-नाशिक महामार्गाला आमने इंटरचेंजजवळ समृद्धी कॉरिडॉरसह जोडणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचे संपूर्ण मुंबईनागपूर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण रखडले.
इगतपुरी ते आमणे दरम्यानच्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या भागाचे काम जवळपास पूर्ण झाले असून मुंबई-नाशिक महामार्गाशी इंटरचेंजला जोडणाऱ्या रस्त्याचे कामही प्रगतीपथावर असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची माहिती
एमएसआरडीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती आमणे इंटरचेंज ते मुंबई-नाशिक महामार्गापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला काही गोदामे अस्तित्वात आहेत. पावसाळ्यात गोदामे पाडून रस्ता तयार करणे हे आव्हानात्मक काम होते त्यामुळे त्या भागात काम पूर्ण करण्यास विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले..