India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणा

Continues below advertisement

कानपूर : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (India vs Bangladesh, 2nd Test) भारताने आपला पहिला डाव 9 बाद 285 धावांवर घोषित केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव भारताने 233 धावांत गुंडाळला होता. भारताला पहिल्या डावात 52 धावांची आघाडी मिळाली. पावसाने व्यत्यय आणलेल्या कानपूर कसोटीचा आज चौथा दिवस होता. भारताने कानपूर कसोटी अनिर्णित राहण्याची चिन्हे असताना विजयाकडे वळवली आहे.

दरम्यान, भारताने आज बांगलादेशचा डाव गुंडाळल्यानंतर आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जैस्वालने (Yashashwi Jaiswal) पहिल्या 3 षटकातच 51 धावा केल्या. रोहित आणि यशस्वीने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे केवळ 12 षटकांत भारतीय संघाने  1 बाद 121 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 51 चेंडूत धडाकेबाज 72 धावा ठोकल्या. तर कर्णधार रोहित शर्मा 11 चेंडूत 23 धावा करुन माघारी परतला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram